आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादसह सहा जिल्ह्यांत ‘आपले सरकार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाइन पद्धतीने थेट सरकारसमोर मांडण्यासाठी फडणवीस सरकारने ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे अाैचित्य साधून या पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जनतेला ऑनलाइन सेवा देण्यासाठी मंत्रालय स्तरावर हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता या सेवेचा जिल्हा स्तरावर विस्तार करण्यात येत अाहे. प्रायाेगिक तत्त्वावर सुरुवातीला औरंगाबाद, नाशिक, अमरावती, ठाणे, पुणे आणि नागपूर या सहा जिल्ह्यांत हा प्रयाेग राबवला जात अाहे. त्यानंतर उर्वरित ३० जिल्ह्यांतही हा प्रयोग लवकरच सुरू करण्यात येईल.

२१ दिवसांत तक्रार निवारण
नागरिकांना घरबसल्या माेबाइल, संगणकाच्या साह्याने शासनाच्या सेवा देण्यासाठी हे पोर्टल सुरू झाले. त्याद्वारे आपल्या तक्रारी मांडण्यासाठी किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबंधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्यासाठी हे व्यासपीठ आहे. लाेकांच्या तक्रारींचे २१ दिवसांत निराकरण केले जाते.