आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियाची टॉप पोल डान्सर आहे ही मुस्लिम महिला...अशी आहे तिची संघर्षगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लिम धर्मात 1400 वर्षांपासून सुरु असलेली तिहेरी तलाक प्रथेला सुप्रीम कोर्टाने 6 महिन्यांसाठी बंदी घातली. पाच महिलांनी हा लढा लढला.  देशातील 9 कोटी मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालामुळे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून भारतात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला अशाच एका मुस्लिम महिलेविषयी माहिती घेऊन आलो आहे. आरिफा असे या महिलेचे नाव असून ती मुंबईत राहाते. विशेष म्हणजे ती एक प्रोफेशल पोल डान्सर आहे. यूट्यूबवरील एका लोकप्रिय चॅनलवर आरिफाने आपली कहाणी सांगितली होती.

आईच्या पाठबळामुळेच बनू शकली पोल डान्सर...
- आरिफा भिंडरवाला हिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, आई नफीसा भिंडरवाला हिने तिला साथ दिली नसती तर ती कधीच पोल डान्सर बनू शकली नसती.
- आरिफाने सांगितले की, पोल डान्स ही एक कला आहे. पोल डान्स हा तिचे पॅशन आहे.
- आरिफाही बोहरी मुस्लिम समाजातील आहे. आरिफा सांगते की, ती आज मॉडर्न झाली असली तरी तिची बहीण आजही हिजाब परिधान करते.
- आरिफा पोल डान्स करते तेव्हा ती स्वत:ला स्वतंत्र समजते. सगळ्या बंधनातून मूक्त झाल्याचा अनुभव तिला येतो.
- पोल डान्सला मुस्लिम समाजात मान्यता नाही. परंतु, पोल डान्स हा मुस्लिम समाजातील मुलींच्या स्वातंत्र्याचे प्रतिक असल्याचे ती सांगते.
- आरिफाची बॉडी हीच तिची बेस्टफ्रेंड आहे. आरिफा ही मुंबईत मुलींना पोल डान्स शिकवते.

आरिफा भिंडरवाला हिच्या पोल डान्सचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...