आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबांची मागणी मान्य; आता दौरे इनोव्हा गाडीतून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी अ‍ॅम्बेसेडरऐवजी इनोव्हा गाडी द्यावी, अशी मागणी काही महिन्यांपूर्वी केली होती. ती लवकरच पूर्ण होणार आहे. वित्त विभागाने सामान्य प्रशासन विभागाचा याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
राज्याच्या बहुतेक सर्व मंत्र्यांकडे आलिशान गाड्या आहेत. मात्र पाटील जुन्या अ‍ॅम्बेसेडरमधूनच फिरत असत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इनोव्हा गाडी खूप आवडते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना आबा याच आवडत्या गाडीतून राज्यभर फिरत होते. मंत्री झाल्यानंतर मात्र त्यांना अ‍ॅम्बेसेडर मिळाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी इनोव्हा गाडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती.


15 लाखांची गाडी
आबांना मिळणारी इनोव्हा अत्यंत आधुनिक मॉडेलची असणार आहे. इनोव्हा मल्टी युटिलिटी वाहन (एमयूव्ही) असून यामध्ये जीपीएस यंत्रणेसह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अनेक बदल करण्यात आलेले आहेत. ही गाडी सातआसनी असली तरी गृहमंत्र्यांसाठी यामध्ये एक विशेष सीट तयार करण्यात आल्याने फक्त पाच जण गाडीत बसू शकणार आहेत. गाडीत बदल केल्याने त्याची किंमत एकूण किंमत 15 लाख रुपयांच्या आसपास जाणारी आहे.