आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला शिक्षा मिळवून देण्यात यांची राहिली मुख्य भूमिका, गहाळ फाइल शोधून जिंकली केस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात 13 वर्षांनंतर बॉलिवूड स्टार सलमान खानला पाच वर्षांच्या सक्तमजूरीची शिक्षा सुनावली गेली आहे. बुधवारी काही तासातच हायकोर्टातून त्याला अंतरिम जामीन देखील मिळाला. मात्र, अजूनही त्याच्यावरील संकट टळलेले नाही. सलमानला शिक्षा मिळवून देण्यात ज्या लोकांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे त्यात अॅड. आभा सिंह यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. त्यांनी एक याचिका दाखल करुन आरोप केला होता, की पोलिस सलमानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आभा सिंह यांनी एकूण पाच याचिका दाखल केल्या होत्या. त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, की बहुचर्चित एलिस्टर परेरा प्रकरणात एक वर्षात सुनावणी पूर्ण झाली होती. नुरिया हवेलीवाला प्रकरणात लवकरच निर्णय दिला गेला होता, मग सलमानच्या प्रकरणातच एवढा वेळ का लागत आहे.
2012 मध्ये त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पोलिसांनी सलमान प्रकरणातील गायब झालेल्या फाइल शोधून काढल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, की जर सलमानसोबत कारमध्ये असलेले पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या कमाल खानला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार का केले नाही ? आभा सिंह यांनी त्यांच्या याचिकेत सलमानसोबत असलेला पोलिस बॉडिगार्डची बाजू भक्कमपणे मांडली होती. बचाव पक्षाकडून अशोक सिंहला ड्रायव्हर म्हणून उभे करण्याला आभा सिंह यांनीच जोरादार आक्षेप घेतला होता. त्या म्हणाल्या होत्या, अशोक सिंहला 12 वर्षे त्याच्या चुकीची जाणीव का झाली नाही, त्याला आताच का पश्चाताप होत आहे.
प्रदीर्घ काळ चालेल्या या खटल्यानंतर आरोपीला शिक्षा झाली आहे. त्यानिमीत्त भास्कर समुहाने आभासिंह यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी पोलिसांनी सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्यात फरक केला नाही पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्यांनी निष्पक्षपणे आपले काम करावे.
पुढील स्लाइडवर वाचा, आभा सिंह यांची या प्रकरणाबद्दलची मते