आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Singhvi News In Marathi, Ashok Chavan, Chief Minister, Divya Marathi

मुख्यमंत्री चव्हाण विकास मांडण्यात कमी पडतात,अभिषेक संघवी यांचा घरचा आहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आपले राज्य विकासात पुढे असल्याचे रेटून सांगतात. मात्र, गुजरातपेक्षा जास्त विकास होऊनही महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र केलेली कामे छातीठोकपणे सांगता येत नाही, हे दुर्भाग्य आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक संघवी यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गुरुवारी घरचा आहेर दिला.


संघवी दोन दिवसांच्या महाराष्‍ट्राच्या दौ-यावर आले असून गुरुवारी त्यांनी गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘गुजरातप्रमाणे महाराष्‍ट्र, दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश व बिहार या राज्यांचाही विकास झाला. एकूण विकासाचा विचार करता गुजरात सहाव्या स्थानावर आहे. मात्र, मोदी सतत रेटून विकास झाल्याचे सांगत असल्याने तेच प्रथम असल्याचा भास होत आहे. खरे तर आपण केलेली कामे पृथ्वीराजांना पुढे येऊन सांगता आली असती, पण ते कमी पडले.’


शरद पवारांचा पक्ष वेगळा
गुजरात दंगलीसंदर्भात नरेंद्र मोदी यांना कोर्टाने क्लीन चिट दिल्याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्‍ट्रवादीचे नेते सांगत आहेत. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता संघवी म्हणाले की, ‘त्यांचा पक्ष वेगळा आहे.

काँग्रेसला तसे वाटत नाही
मोदींना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. एसआयटीचे म्हणणे एका न्यायालयाने मानले असले तरी त्यावर उच्च तसेच सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांचे निर्णय बाकी आहेत. त्यामुळे मोदी निर्दोष असल्याचे


भाजप देश कसा चालवणार ?
‘केंद्रात सत्ता मिळवण्याचे दावे करणा-या भाजपमधील नेत्यांमध्ये आपसातच वैमनस्य आहे. पक्षात विश्वासाचा अभाव असून गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आपल्याला विजयी होऊ देणार नाहीत, म्हणून लालकृष्ण अडवाणींनी भोपाळमधून उमदेवारी मागितली. ज्या पक्षातील नेत्यांना एकमेकांचा विश्वास नाही, असा भाजप संपूर्ण देशाचा विश्वास कसा मिळवणार,’ असा टोला संघवी यांनी लगावला.