आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abishek Bachchan Owned Jaipur Pink Panthers Win Pro Kabaddi Title

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: \'जयपूर पिंक\'च्या विजयानंतर जल्लोषात बुडाले ऐश्वर्या-अभिषेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंकने विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने विरोधी टीमच्या खेळाडूला टिपल्यानंतर खेळाडू जसा आनंद व्यक्त करतो तशीच पोझ दिली.)
मुंबई- ‘जयपुर पिंक पॅंथर्स’ने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे. अभिषेक बच्चनच्या जयपूर टीमने रविवारी रात्री अंतिम फेरीत यू मुंबा टीम 35-24 असे नमविले. पाटणा पायरेट्सने बंगळुरु बुल्सला 29-22 असे हरवून स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
पहिल्या प्रो कब्बडी लीगचा रविवारी रात्री मुंबईतील सरदार पटेल स्टेडियमवर अंतिम सामना झाला. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. याचबरोबर इतर क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली. या अंतिम सामन्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले. पहिल्या हॉफमध्ये दोन्ही संघांनीही सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, जयपूरने यू मुंबाला कोणतेही संधी दिली नाही. मुंबईचा कर्णधार अनुपकुमार एकटा किल्ला लढवित होता. मात्र, त्याला इतर सहका-यांची साथ मिळाली नाही. अखेर जयपूरने विजेतेपदावर काम कोरले. जयपूरने विजेतेपद मिळवताच संघाचा मालक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी एकच जल्लोष केला. अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक हस्ती पोहचल्या होत्या. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी जबरदस्त परफॉरमन्स सादर करीत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.
जयपुर पिंक पॅंथर्सने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखले. या संघाने 14 पैकी 10 मॅच जिंकल्या. याचबरोबर अंकतालिकेत 54 गुण घेऊन प्रथम स्थान मिळवले होते. सेमी फायनलमध्ये जयपूरने पाटणा पायरेट्सचा 38-18 चा एकतर्फी धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
विजेत्या टीमला एक कोटी रूपये- या स्पर्धेत विजेतेपद पटकावणा-या जयपूरला टीमला 1 कोटी रूपये बक्षिस मिळाले. उपविजेत्या यू मुंबाला 50 लाख रूपये तर तिस-या क्रमांकावरील पाटणा टीमला 15 लाख रूपये मिळाले. चौथ्या स्थानावर राहणा-या बंगळुरु बुल्सला 10 लाख रूपये मिळाले.
अनुपकुमार नंबर वन- यू मुंबाचा कर्णधार अनुपकुमार याने या स्पर्धेत एकून 156 गुण मिळवले. सर्वाधिक गुण मिळण्याचे बक्षिस त्याला मिळाले. तेलुगू टायन्टसचा राहुल चौधरी (151) दुस-या तर, मनिंदर सिंह (129) तिस-या क्रमांकावर राहिले.

ट्विटर ट्रेंडवर तिस-या क्रमांकावर- आयपीएलच्या धर्तीवर सुरु झालेल्या आठ टीममध्ये खेळवली गेलेली प्रो कबड्डी लीग खूपच लोकप्रिय ठरली. याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की अंतिम सामन्याच्यापूर्वी ही लीग ट्विटरवर तिस-या क्रमांकावर ट्रेंड करीत होती. लीगचे प्रसारण करणा-या स्टार स्पोर्ट्सने म्हटले आहे की, या लीगदरम्यान आमचा टीआरपी कमालीचा वाढला आहे.
पुढे पाहा, मुंबईत खेळला गेलेल्या अंतिम सामन्यातील छायाचित्रे...