आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलविरोधात मुंबईत निदर्शने; अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पॅलेस्टाइनवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासावर जोरदार निदर्शने केली.

या वेळी कार्यकर्त्यांनी इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इस्त्रायलच्या वाणिज्य दूतावासाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तरीही दूतावासाजवळ जाऊन आंदोलनकर्त्यांना विरोध दर्शवला.

या वेळी समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव व प्रवक्ते अब्दुल कादीर चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष अशोक गायकवाड, प्रदेश महासचिव मेराज सिद्दिकी, फिरोज मिठीबोरवाला, सी.पी.एम.चे महासचिव महेंद्र सिंह यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.