आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या आणखी दोघांना मिळाले होते पाकमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई बाँबस्फोटातील आरोपी जबिउद्दीन अन्सारी याच्यासोबत बीड जिल्ह्यातील आणखी दोन अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. जबीने कबुलीजबाबात मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. अबू शेरजिल आणि अबू झरार अशी दोघांची नावे आहेत.
2006 मध्ये पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पवर जबीची चार भारतीयांशी ओळख झाली. त्यात बीड जिल्ह्यातील या दोघांसह अबू मसद (जम्मू) आणि अबू झैद यांचाही समावेश होता. झैदचे गाव मात्र जबीला सांगता आले नाही. या चौघांचा मुंबई हल्ल्याशी प्रत्यक्ष संबंध होता किंवा नाही, याची माहिती नसल्याचेही जबीने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यानंतर दबाव वाढल्याने पाकमध्ये धाडी टाकण्यात आल्या. मात्र सुरक्षा दलांच्या या धाडी केवळ नाटक होते. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कथित धाडींची माहिती तोयबाच्या अतिरेक्यांना आधीच देण्यात आली होती, असेही जबीने सांगितले.
धाडीत ज्या लोकांना पकडण्यात आले त्यांना तुरुंगांत न ठेवता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. धाडी टाकण्यापूर्वी लष्करातील हस्तकांनी तोयबाच्या म्होरक्यांना पुरावे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जबीच्या या कबुलीमुळे मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानातील तपास एक नाटक होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अबू जिंदालसाठी विशेष पथकाची नियुक्ती; 31 जुलैपर्यंत कोठडी
भारताला हवा असलेला अबू हमजा जिवंत नाहीः जबिउद्दीनचा खुलासा