आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 च्या हल्ल्यातील मुख्‍य सूत्रधार अबू जुंदालचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर-ए- तोयबाचा अतिरेकी जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याने बुधवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

मुंबईतील हल्ला, वेरूळ जवळील शस्त्रास्त्रे तस्करी प्रकरण व नाशिकमध्ये घातपाती कारवाया करण्याचा रचलेला कट अशा अनेक दहशतवादी कारवायांत जबी गुंतला असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

जबीचे वकील एजाज नख्वी यांनी अर्जात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून तो तुरुंगात आहे. सुनावणीला अजूनही सुरुवात झाली नाही. राज्य सरकार हेतुपुरस्सरपणे सुनावणीस विलंब करत आहे. जबी निरपराध असून त्याला नाहक गोवण्यात आल्याचा दावा नख्वी यांनी केला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल.