आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेम हल्लाप्रकरणी देवेंद्र जगतापच्या पत्नीची होणार चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमवर तुरुंगात गोळीबार करणा-या देवेंद्र जगतापच्या अटकेची पोलिसांना परवानगी दिली आहे.जगताप ऊर्फ जेडीने तळोजा तुरुंगात सालेमवर गोळीबार केला होता. जेडी तळोजा तुरुंगातील कच्चा कैदी आहे. गोळीबारापूर्वी जेडीला सत्र न्यायालयात घेऊन जाणा-या 10 पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. जेडीला न्यायालय परिसरात भेटणारी त्याची पत्नी व अन्य तिघांचीही चौकशी केली जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.

छायाचित्र - अबू सालेमवर तळोजा तुरुंगात हल्ला झाल्यानंतर वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. एनएमएमसी रुग्णालयातून बाहेर पडताना सालेमचे हे एक्सक्ल्युझिव्ह छायाचित्र.