आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abu Salem Did Nikaha In Train, Tada Court Orders To Enquiry

अबू सालेमचा ट्रेनमध्येच फोनवरून 27 वर्षीय तरूणीबरोबर निकाह, यत्रंणाचे कानावर हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एके काळचा अंडरवर्ल्ड डॉन आणि बनावट पासपोर्टप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या अबू सालेमने मुंबई ते लखनौ या ट्रेन प्रवासातच निकाह केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सालेमने निकाह केल्याच्या वृत्ताची टाडा कोर्टाने तत्काळ दखल घेत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या घटनेची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, सालेमने हे वृत्त खोटे व तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. तसेच पोलिस व सुरक्षा यत्रंणानी या घटनेबाबत कानावर हात ठेवले आहेत.
सालेमने ट्रेनमध्येच निकाह केल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले होते. या वृत्तात म्हटले होते की, एखाद्या चित्रपटात शोभाव असा प्रसंग 8 जानेवारीला मुंबई ते लखनौ ट्रेनमध्ये घडला. अबू सालेमला बनावट पासपोर्टप्रकरणी मुंबईहून लखनौकडे नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने ट्रेनमध्येच ठाणे परिसरातील मुंब्रा येथे राहणा-या 27 वर्षीय मुस्लिम तरूणीसोबत निकाह केला. मुंबईतील एका काझींने फोनद्वारे हा निकाह लावून दिल्याची सांगण्यात येत आहे. या निकाहला सालेमचा भाचा अॅड. रशीद अन्सारी आणि सालेमला लखनौला घेऊन जाणारे पोलिस साक्षीदार असल्याचे म्हटले आहे.
पुढे वाचा, 10 दिवसात अहवाल देण्याचे आदेश...