आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' युवतीशी विवाह करण्यास गँगस्टर सालेमचा होकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी व गँगस्टर अबू सालेम याने "त्या' युवतीशी विवाह करण्याची परवानगी मागणारा अर्ज सोमवारी न्यायालयाकडे सादर केला.

गेल्या आठवड्यात संबंधित युवतीने विशेष टाडा न्यायालयात अर्ज सादर करून आपल्याला अबू सालेम याच्याशी विवाह करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी सालेमला लखनऊ येथे सुनावणीसाठी नेताना दोघांनी रेल्वेत निकाह केल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या. त्यानंतर तरुणीने तिचे आणि सालेमचे फोटोही न्यायालयात सादर केले होते.
सालेमशी संबंध असल्याच्या कारणावरून कोणीही आपल्याशी विवाहास तयार होत नाही. ज्या ठिकाणी आपण राहतो तेथील लोक आपल्याकडे संशयाने पाहतात. त्यामुळे मला केवळ सालेमशीच विवाह करायचा आहे, असेही युवतीने आपल्या अर्जात म्हटले आहे. यानंतर सालेमच्या वतीने सोमवारी न्यायालयात अर्ज करण्यात आला. यात सालेम म्हणतो, मलाही या युवतीशी विवाह करायचा आहे. तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना माझा हा संदेश आहे. मी पत्नी म्हणून तिची काळजी घेईन, असेही सालेमने आपल्या अर्जात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...