आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी सायकलचे पंक्चर बनवायचा अबू सालेम; वाचा..अंडरवर्ल्ड डॉनचा थक्क करणारा प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सन 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात अबू सालेम याला कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे. गावात सायकलचे पंक्चर काढणारा अबू सालेम अल्पावधीत अंडरवर्ल्डचा डॉन बनतो. देशाच्या आर्थिक राजधानीवर राज्य करतो. बॉलिवूडमध्ये दहशत पसवतो. देशात दहशतवादी कारवाया करतो. अबू सालेमचा आझमगड ते मुंबई हा प्रवास थक्क करणारा आहे. सालेम 1984 मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आला होता.

अबू सालेम असा बनला अंडरवर्ल्ड डॉन...
- उत्तर प्रदेशातील आझमगडपासून 35 किलोमीटर अंतरावरील सरायमीर हे अबु सालेमचे जन्मगाव.
- अबू सालेमचे वडील अब्दुल कय्यूम हे वकील होते. एका अपघातात त्यांचे निधन झाले होते.
- वडिलांच्या पश्चात अबूचे शिक्षण अर्ध्यात सुटले. गावातील एका छोट्या सायकलच्या दुकानात काम करावे लागले. सायकलचे पंक्चर काढले.
- कामाच्या शोधात तो दिल्लीत आला. दिल्लीत त्याने टॅक्सी चालवली. मात्र, दिल्लीत त्याचे मन रमले नाही. तो 1984 मध्ये शमी नामक एका मित्रासोबत तो मुंबई पोहोचला.
- मुंबईतील जोगेश्वरीत त्याने सुरुवातीला टॅक्सी चालवली.
- एका दुकानावरही काम केले. दुकानासमोर अजीज टिंगा हा येऊन बसत होता. तो गुजरातमधील नामी स्मगलर होता.
- अजीज टिंगा हा अबूला एक टक पाहायचा. एके दिवशी अबूने टिंगाला हटकले. 'तू मुझे घूर-घूरकर क्यों देखते हो?'
- त्यावर टिंगाने उत्तर दिले 'मुझे तुममें में भविष्य का डॉन दिखाई देता है'
- त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली.
- नंतर मात्र अबू मागे वळून पाहिले नाही. तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आला.
- अबूच्या कामाव तो जाम खूश होता. दाऊदसोबत त्याने मुंबईवर राज केले.
- अबू सालेमने अंडरवर्ल्डच्या जगतात कॅप्टन नावाने स्वत:ची ओळख निर्माण केली.
- दाऊद इब्राहिमने दुबईला पलायन केल्यानंतर अबू सालेम याने मुंबईवर राज्य केले.   
- 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद विध्वंस झाल्यानंतर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत सीरियल ब्लास्ट झाले. त्यात अबू सालेमचा महत्त्वाचा रोल होता.

अबु सालेमच्या लव्हस्टोरीवर पुस्तक...
अबू सालेम यांच्या लव्ह स्टोरीवर एका प्रशासकीय अधिकारीने पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात जिवंतपणा येण्यासाठी तुरुंगात जाऊन अबू सालेमची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याला यात यश आले नाही. या पुस्तकात लेखकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अंडलवर्ल्ड डॉन अबू सालेमसह त्याच्या गर्लफ्रेड्‍सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...