आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या घराबाहेर \'ABVP\'च्या कार्यकर्त्यांची निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संजय दत्त भलेही 30 दिवसाच्या पॅरोल सुट्टी घेऊन मुंबईत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असला तरी त्याच्या समस्या काही केल्या कमी होत नाहीत. सामान्य गुन्हेगारापेक्षा संजय दत्तला चांगली वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत आज सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी)च्या 10-15 कार्यकर्त्यांनी संजयच्या वांद्र्यातील घराबाहेर निदर्शने केली.
यावेळी या कार्यकर्त्यांनी संजय दत्तच्या विरोधात घोषणा दिल्या. 'संजय दत्त ये तुने क्या किया? देश का नाम बदनाम किया' अशा घोषणा दिल्या. तसेच राज्य सरकार संजयला विशेष वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पोस्टरवर लिहून नाराजी व्यक्त केली. तसेच संजयचा पॅरोल तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. सुमारे तासभर या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
आणखी पुढे वाचा...