आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कॉर्पोरट’साठी बेस्टच्या एसी बसेस, ऑनलाइन नोंदणीची सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील एसी बस सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आता कंपन्या आणि कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचा-यांसाठी पॉइंट टू पॉइंट एसी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता.
मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटच्या पुढाकाराने या योजनेचा आराखडा तयार करण्यात येत असून बेस्टच्या या बसेस लवकरच मुंबईच्या रस्त्यांवरून धावताना दिसणार आहेत. कंपनी ऑनलाइन नोंदणी करून बससेवा सुरू करू शकतील. परदेशातील वाहतूक व्यवस्थेप्रमाणे मुंबईतही वाहतूक व्यवस्था असावी यासाठी योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटला दिले होते. त्यानुसार या युनिटने बेस्ट आणि मुंबई वाहतूक
पोलिसांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन यांच्यासमवेत झालेल्या बैठकांमध्ये या आराखड्याला अंतिम रूप देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. या नव्या एसी बसेस मुंबईतील प्रमुख व्यापारी, व्यावसायिक केंद्रांना उपनगरांशी जोडणार आहेत.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नरिमन पॉइंट, नवी मुंबई, दक्षिण मुंबई तसेच मुंबईतील उपनगरांमध्ये या बसेस धावणार आहेत. या बसेस सुरू झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटेल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी प्रवाशांची मागणी व वाहतुकीचा मार्ग ठरवण्यासाठी एक सर्व्हे करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट ऑफिसेसना या योजनेविषयी माहिती देण्यात येणार असून सेवेविषयी अधिक माहिती mailmtsu@gmail.com या ई-मेलवर मेल करून मागवता येईल, असेही वरिष्ठ अधिका-यांनी बोलताना सांगितले.