आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसीबी’च्या कामगिरीचे अमेरिकेसह पाकमधूनही काैतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार यांच्याविराेधात सुरू केलेली धडाकेबाज कारवाई असाे की अन्य धाडसत्रे, राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सध्या चांगलाच चर्चेत अाला अाहे. या विभागाच्या कामगिरीचे केवळ देशातूनच नव्हे, तर विदेशातही काैतुक हाेत अाहे. ‘एसीबी’च्या अधिकृत फेसबुक पेजवर अमेरिका, यूएई, सौदी अरेबिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कतार, जर्मनी, मलेशिया, कुवेत आणि कॅनडातील अनिवासी भारतीयांकडून भरघोस लाइक्स मिळत अाहेत. शेजारच्या पाकिस्तानातूनही कौतुकाची थाप पडत आहे.

देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून परदेशात गेलेल्या अनिवासी भारतीयांनी अाता ‘एसीबी’ची कामगिरी पाहून राज्यात पुन्हा येऊन उद्याेगधंदे सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. एसीबीचे हे कौतुक पाहायचे असेल तर www.facebook.com/MaharashtraACB या पेजला नक्की भेट द्या. या पेजला ११ जूनपर्यंत २४ हजार २४३ लाइक्स मिळाल्या आहेत. एसीबीच्या चाहत्यांमध्ये ७ टक्के महिला, तर ९३ टक्के पुरुष आहेत. विशेष म्हणजे त्यातील ७९ टक्के चाहते १८ ते ३४ या वयोगटातील आहेत. पाकिस्तानातूनही एसीबीच्या फेसबुक पेजवरील कामगिरीला तब्बल ३२ जणांनी पसंती दर्शवली आहे, तर अमेरिकेतून ९७, यूएईमधून ७८, सौदी अरेबियामधून ३७ जणांनी ‘एसीबी’ला दाद दिलेली आहे.

तक्रारीसाठी ‘अॅप’ची साेय
सहज तक्रार करता यावी म्हणून एसीबीने एक मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपवरून तक्रार करण्यात मुंबईकर आघाडीवर आहेत. चंद्रपूरकर दुसऱ्या, तर पुणेकर तिसऱ्या क्रमांकावर अाहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर व औरंगाबाद या शहरांतून मात्र अद्याप अॅपला प्रतिसाद मिळालेला नाही.

‘एसीबी’शी संपर्क साधा
>टोल फ्री नंबर १०६४
> मोबाइल अॅप - www.acbmaharashtra.net
> वेबसाइट - www.acbmaharashtra.gov.in
> फेसबुक पेज - www.facebook.com/MaharashtraACB

महसूल लाचखोरीत अव्वल
विभाग लाचखाेर
महसूल विभाग १५२
गृह विभाग १३३
ग्रामविकास खाते ८४
नगरविकास खाते ४९
महिला व बालविकास ०५

नवे साॅफ्टवेअर तयार करणार
सूत्रे हाती घेतल्यानंतर काही बदल केले. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. भविष्यात हा विभाग अधिक सक्षम बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे नियमन करणे तसेच गुन्ह्याच्या तपासाची अद्ययावत नोंद करण्याकरता आम्ही आता स्टेट डेटा बँक नावाचे नवे सॉफ्टवेअर तयार करत आहोत.
-प्रवीण दीक्षित, महासंचालक, एसीबी