आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबई: 20 लाखांची लाच घेताना सेल्स टॅक्स अधिका-याला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईतील एका बिल्डरकडून व्हॅट टॅक्सवरील दंड वसूल करण्यासाठी खोटी नोटिस पाठवून 60 लाख रूपयांची लाच मागणा-या सहाय्यक विक्रीकर आयुक्त रामदास पानजी शिंदे या अधिका-याला 20 लाख रूपये स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपींसह मध्यस्थी करणा-या दलालाही गजाआड करण्यात आले आहे. या घटनेने पनवेल तसेच मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही मागणी कोणत्या बिल्डरकडून केली त्याचे नाव सांगण्यास एसीबीने नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील जेऊन कुंभार्ली येथील मुळचे रहिवासी व मुंबईतील विक्रीकर कार्यालयात सहाय्यक विक्रीकर आयुक्तापदावर काम करणारे रामदास शिंदे यांनी सन व्हॅट भरण्याची लेखी नोटिस सहाय्यक विक्रीकर आयुक्त ताथरे यांच्या खोट्या सहीने पाठवून कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी मध्यस्थामार्फत संपर्क साधण्यात आला. मात्र, संबंधित बिल्डर मुंबईतील मुख्य कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी हा खोट्या नोटिसीचा प्रकार उजेडात आला. त्यानंतर बिल्डराने ही माहिती एसीबीला दिली.
एसीबीने सापळा रचून शिंदेला पकडण्यासाठी तयारी केली. संबंधित बिल्डराने 60 लाख रूपयांची मागणी मान्य करीत पहिला हप्ता म्हणून 20 लाख देण्याचे मान्य केले. शिंदेने मध्यस्तामार्फत पैसे स्वीकारण्याचे ठरवले होते. मात्र, संबंधित बिल्डराने आपण स्वत पैसे देण्यास येत आहोत असे कळवले. एसीबीने लावलेल्या सापळ्यानुसार बिल्डरकडून रोख 20 लाख रूपये स्वीकारताना शिंदेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मध्यस्ती करणा-या दलालांनाही अटक करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...