आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना क्लीन चिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविरोधात दाखल तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट करत ‘एसीबी’ने ही चौकशी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. पाटील यांच्या उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे असलेली मालमत्ता जमवण्यास पुरेसे सक्षम असल्याचे चाैकशीत आढळून आले आहे.

डॉ. पाटील नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ असून त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे मोठे रुग्णालय आहे. तसेच वडिलोपार्जित १४० एकर जमिनीपैकी ३२ एकरची ते शेती करतात. त्यांचे वडील विठ्ठलराव पाटील हे जिल्हा परिषदेचे सभापती तसेच आमदारही होते. पाटील दांपत्याला त्यांच्या व्यवसायातून ३ कोटी १ लाख ५२ हजार ९९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यातून त्यांनी ३३,३६,००० रुपयांची मालमत्ता संपादित केली आहे, असा अहवाल एसीबीने गृहखात्याकडे देत चौकशीवर पडदा टाकला.

अधिकार्‍यांच्याही चौकशीला घाबरते सरकार
एसीबी चौकशी करू पाहत असलेल्या २०१३ पासून आजवरच्या एकूण १७ प्रकरणांत राज्य सरकारने अद्याप अनुमती दिलेली नाही. यात ढोबळे आणि पाटील वगळता इतर व्यक्ती या वरिष्ठ पदावर आहेत. त्यामुळे भ्रष्ट नेत्यांसोबतच भ्रष्ट अधिकार्‍यांवरही कारवाई करायला सरकार घाबरते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अधिकार्‍यांनी अनेकदा सर्वपक्षीय नेते, आमदार वा मंत्र्यांच्या सूचनेवरून गैरव्यवहार केलेला असतो. त्याची सखोल चौकशी केली तर अनेक भानगडी बाहेर पडू शकतात. त्यामुळेच अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका असल्याची चर्चा आहे

काही प्रमुख अधिकारी
- उज्ज्वल उके (तत्कालीन सीईओ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) १७ डिसेंबर २०१४ - पंडित लोणारे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद) ११ सप्टेंबर २०१४ - ए. जे. नवघरे, ( अधीक्षक अभियंता) डिसेंबर २०१४ - व्ही.एस. राजपूत (कार्यकारी अभियंता) डिसेंबर २०१४ - एस.एम. अरगडे (स. अभियंता, तिघेही महावितरण) डिसेंबर २०१४.