आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांवर दुसरे आरोपपत्र महिनाभरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अगोदरच तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कलिना येथील ग्रंथालय भूखंड प्रकरणातही महिनाभरात अाराेपपत्र दाखल हाेणार असल्याची माहिती एसीबीतील सूत्रांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी संकुलातील सरकारी जमीन परस्पर एका विकासकाला हस्तांतरित केल्याप्रकरणी ‘एसीबी’ने भुजबळ व बांधकाम विभागाच्या पाच अधिकाऱ्यांविरोधात जून २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने डिसंेबर २०१४ मध्ये या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती एसीबीने भुजबळ यांच्यासह तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, तत्कालीन कार्यकारी अभियंता हरीश पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड, तत्कालीन अवर सचिव संजय सोलंकी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव एम. एच. शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. लोकसेवकाने केलेली गुन्हेगारी स्वरूपाची वर्तणूक, फसवणूक, खोटी कागदपत्रे सादर करणे, सरकारी महसुलाचे नुकसान तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि त्यात एकमेकांना साहाय्य करणे या आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचे सबळ पुरावे मिळवण्यात तपास पथकाला यश मिळाल्याचा दावा एसीबीच्या एका अधिकाऱ्याने केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...