आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन घाेषणा बनली सरकारच्या गळ्यात अडकलेल्या हड्डीसारखीच, गडकरींची कबूली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अच्छे दिन लाएंगे’ असे अामिष दाखवत २०१४ मध्ये नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अाधी देशात व नंतर राज्यात सत्ता प्राप्त केली. मात्र सरकार बनवून वर्षही हाेत नाही ताेच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन ही केवळ एक घाेषणा असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. अाता दाेन वर्षांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘अच्छे दिनची घाेषणा जणू सरकारच्या गळ्यात अडकलेली हड्डीच बनली अाहे,’ अशी जाहीर कबुली दिली.

मुंबईत अायोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी ‘अच्छे दिन कधी येतील?’ असा प्रश्न विचारण्यात अाला. त्यावर ते म्हणाले, ‘अच्छी दिन कधीच येत नसतात. भारत देश हा असंतुष्ट अात्म्यांचा जणू महासागरच अाहे. त्यामुळे अापल्या देशात कधीच काेणीही समाधानी हाेऊ शकत नाही. ज्याच्याकडे सायकल अाहे, त्याला गाडी हवी असते. ज्याच्याकडे गाडी असते त्याला अजून काहीतरी हवे असते. असेच लाेक विचारतात अच्छे दिन कधी येतील म्हणून? खरे तर अच्छे दिनचा शब्दश: अर्थ न घेता विकासाच्या मार्गावर जाणारा देश किंवा प्रगतशील देश असा घ्यायला हवा,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

गडकरी म्हणाले, ‘खरे तर ‘अच्छे दिन’च्या संकल्पनेची सुरुवात तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी केली हाेती. प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात तेव्हा सिंग म्हणाले हाेते, ‘अच्छे दिन’ येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.’ त्याला प्रत्युत्तर म्हणूनच नरेंद्र माेदी यांनी ‘अामचे सरकार अाल्यावर अच्छे दिन येतील,’ असा विश्वास बाेलून दाखवला हाेता. तेव्हाच ‘अच्छे दिन’ची संकल्पना मांडण्यात अाली हाेती. ही बाब मला माेदीजींनीच सांगितली हाेती.’ हे स्पष्ट करतानाच अापले हे वक्तव्य वेगळ्या अर्थाने घेऊ नये, अशी विनंतीही गडकरींनी माध्यमांना केली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भाजप नेत्यांचे घूमजाव ...
बातम्या आणखी आहेत...