आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग: करुळ घाटात ट्रक व डंपरची धडक, जखमी ट्रक चालक उपचारादरम्यान फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी - वैभववाडी ते कोल्हापूर येथे वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरला वैभववाडीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास करुळ दिंडवणे येथील धोकादायक वळणावर झाला. या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तो पसार झाला. वैभववाडी पोलिस त्याचा शोध घेत आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसांना त्‍याचा शोध लागू शकला नाही. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक सुखदेव माराय्या दौडमणी (वय 36) हे डंपरमध्‍ये (MH 071863) वाळू भरुन कोल्हापूरला नेत असताना करुळ दिंडवणे येथील धोकादायक वळणावर वैभववाडीच्या दिशेने येणारा ट्रक (MH 20 CT 8099) त्‍यांच्‍या डंपरला समोरुन उजव्‍या बाजुला धडकला. ट्रकचे चालक सोमीनाथ रमेश बिडोरे औरंगाबादमधील कुलंबरी तालुक्‍याचे रहिवासी आहेत. डंपर चालक हे मूळचे ता. अफझलपूर, औरंगाबादचे रहिवासी आहे. 
 
या अपघातात डंपर चालक व ट्रक चालकासोबत असणाऱ्या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र ट्रकचालक उपचारादरम्‍यान पसार झाला. वैभववाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन कदम करीत आहेत.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अपघाताचे फोटोज...
 
 
बातम्या आणखी आहेत...