आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या नादात भाजलेल्या तरुणाचा मृत्यू; मालगाडीवर चढून सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंबरनाथ स्टेशनमध्ये मालगाडीवर चढून सेल्फी घेणे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. इलाराज अनिकेत असे मृत तरुणाचे नाव आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली पडून गंभीर होरपळला होता. उपचार सुरु असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

काय आहे हे प्रकरण?
अंबरनाथ स्टेशनवर काल (शुक्रवारी) दुपारी ही घटना घडली. सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली पडला. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... सेल्फीच्या नादात दरीत कोसळली गर्भवती महिला; नागरिकांनी वेळीच मदत केल्याने वाचला जीव
बातम्या आणखी आहेत...