आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद महिला वकिलाने ठाेकरले, मुंबईत २ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील ईस्टर्न फ्री वे वर मंगळवारी पहाटे अडीच वाजता ऑडी-टॅक्सीच्या धडकेत दोन जण ठार, तर दोघे जखमी झाले. या प्रकरणी दारूच्या नशेत असलेली ऑडीचालक अॅड. जान्हवी गडकर हिला अटक करण्यात आली आहे.
सलीम सबूनवाला व सय्यद हुसेन अशी मृतांची नावे आहेत. सबूनवाला यांचा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी ते कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवणानंतर एका टॅक्सीतून ते सर्व जण घरी परतत होते. टॅक्सी ईस्टर्न फ्रीवेवर असताना भरधाव वेगात आलेल्या एका ऑडीने त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. या भीषण अपघातात टॅक्सीचा चक्काचूर झाला. टॅक्सीतील दोघे जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले. ऑडीत एअर बलून असल्याने जान्हवी गडकरला इजा झाली नाही.