आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटून 12 प्रवासी जखमी; अपघातानंतर चालक, वाहक फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर मुंबई-विरार येथून सुटलेली व आचरा मालवण येथे जाणारी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने 12 जण जखमी झाले आहेत.
रामेश्वर ट्रॅव्हल्सची (क्र. एम. एच. 04, जीपी 8085) ही बस शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्यामुळे उलटली. अपघातानंतर चालक व क्लिनर फरार झाले आहेत.
 
विरार येथून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता रामेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस सुटली होती. गाडी नेहमीच्या चालकाने न घेऊन जाता आपल्या ओळखीच्या विश्वासू दुसऱ्या चालकाकडे दिली होती. आचरा येथे ही बस घेऊन जायला सांगितले होते. मात्र शनिवारी पहाटे खारेपाटण टाकेवाडी येथे गाडी आली असता अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ती डाव्या बाजूला उलटली.
 
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले तर अपघातातील गंभीर 2 जखमी प्रवाशांना कणकवली येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
 
जखमी प्रवाशांची नावे
मनाली सुनील अपराज (22, आचरा-मालवण), जयप्रकाश श्रीधर म्हापणकर (58, आचरा-मालवण), नीलिमा नारायण गुरव (45, मणचे- देवगड), नारायण बाबाजी गुरव (49, मणचे-देवगड), पुंडलिक धोंडू सावंत (55, चिंदर कोंडवाडी), पल्लवी बापू परब (35, श्रावण-मालवण), लावण्य बापू परब (6, श्रावण-मालवण), नीतेश मिलिंद कणकवलीकर (18), मनीषा कणकवलीकर (50, कणकवली), माया कळसुलकर (56, कणकवली), जुई सुनील अपराज (21, आचरा-मालवण), आजीज गौस कुणकेरकर (22, नांदगाव तिठा)
 
दोघांची प्रकृती गंभीर
जखमी झालेल्या या 12 प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी मनाली सुनील अपराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तसेच पुंडलिक धोंडू सावंत यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. यापूवीर्ही या ठिकाणी दोन वेळा लक्झरी बस उलटल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...