आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीजवळ मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटली; 1 ठार, 12 गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रत्नागिरीजवळ मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याला जाणारी खासगी बस संगमेश्वर जवळच्या रामकुंडच्या वळणावर उलटल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. 
 

अपघातग्रस्त गाडी नाईक कंपनीची आहे. ही गाडी मुंबईहून गोव्याकडे जात होती. गाडी उलटताना क्लिनर अफझल गाडीबाहेर फेकला गेला आणि गाडीखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुजल ठकरार (36, मिरारोड), कविता समीर गुरव (30, राजापूर), काव्य समीर गुरव (7, राजापूर), यश्वी समीर गुरव (4, राजापूर), मोहंमद असलम (31, राजस्थान), शशांक चुबे (45, दादर), शशिरा किशोर मालदे (35, दहिसर), चिराग पंडग्या (33, दहिसर), हर्ष हिमांशू बोरा (14, घाटकोपर), शकुंतला आत्माराम शिवलकर (73, कडवई) हे प्रवासी जखमी असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 
महामार्गावरील अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर 2012 ते 2016 या कालावधीत 2 हजार 542 अपघात झाले. यात 548 जणांचा जीव गेला, तर 2,642 हून अधिक जण जखमी झाले, तर 2017 मध्ये जुलैपर्यंत रायगड जिल्ह्य़ाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर 213 अपघात झाले. यात 40 जणांना जीव गमवावा लागला. तर 233 जण जखमी झाले. यापैकी 121 जण गंभीर होते. यातील काहीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलादपूरजवळ नुकत्याच झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. ट्रकने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला होता.
 
बातम्या आणखी आहेत...