मुंबई/पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कारने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघाता 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात बोरघाटात झाला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या अपघातात शर्वरी अजय कदम (वय. 13) हिचा मृत्यू झाला आहे. तर निलेश दिनेश घाडगे (32, रा. ठाणे), शुभम नाना कदम (19), कुसुम नाना कदम (45), लाला शंकर कदम (45, रा. ऐरोली),
वैशाली अजय कदम (28), जय अजय कदम - (28, रा. बोरिवली) हे जखमी झाले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती