आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर राज्यमार्गावर बोलेरोला अपघात, वृध्द महिला ठार; 5 जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयदुर्ग- कोल्हापूर राज्यमार्गावरील एका वळणावर बोलेरो गाडीला अपघात झाला. या अपघातात वयोवृध्द महिला जागीच ठार झाली, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशीरा ही दुर्घटना घडली. यातील जखमींना कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील मोहिते कॉलनी महेश सावंत हे आपल्या कुटुंबातील सात सदस्यांसोबत सिंधुदुर्गतील वेंगुर्ले येथील पाहुण्यांकडे बोलेरो गाडीने गेले होते. परतीच्या वाटेवर असतांना करुळ येथील चेक पोष्टपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील एका धोकादायक वळणावर बोलेरो पलटी झाली. यामध्ये महेश सावंत यांच्या आईचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर जखमींना कोल्हापूर येथील दवाखाण्यात हलविण्यात आले आहे. मयत वृध्द महिला उशीरापर्यंत गाडीतच अडकून होती. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...