आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदारांची मोठी लॉबी तोडल्यानेच माझ्यावर आरोप : पंकजा मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला व बालविकास मंत्रालयातील कंत्राटदारांची लॉबी तोडल्यानेच माझ्यावर २०६ कोटींंच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप झाल्याचा प्रतिहल्ला खात्याच्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी केला. आरोप करणार्‍यांनी ते सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावेत, असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले.

लंडनहून एका चॅनलकडे मुंडे म्हणाल्या, एकूण खरेदी २०६ कोटींंची व तेवढ्याच रकमेचा घोटाळा, असा आरोप होत आहे. हा बालिशपणा आहे. अंगणवाड्यांना स्वच्छ पाणी देऊ नये का, असा प्रश्न वॉटर फिल्टर घोटाळ्यावर त्यांनी विचारला. त्या म्हणाल्या, चिक्कीत माती आढळल्याचा एखादा प्रकार असेल म्हणून संपूर्ण लॉट खराब आहे, असे म्हणता येणार नाही.

पवारांचे ‘नो कॉमेंट्स’
पंकजा मुंडेंवरील आरोपांसंदर्भात शरद पवार यांनी कानावर हात ठेवले. ते म्हणाले, अशा लहान व्यक्तींविषयी मला बोलायला लावू नका. त्यांनी काय केले मला माहिती नाही. मला दुसरा प्रश्न विचारा.