आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accused Responsibility To Tell Murder Incident High Court

खूनप्रकरणी घटनेबाबत परिस्थिती सांगण्याची जबाबदारी आरोपीवरच - उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परिस्थितिजन्य पुराव्यांवर अवलंबून असलेल्या खुनाच्या खटल्यांमध्ये मृताचा खून कसा झाला, त्या घटनेच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देणे हे आरोपीचेच कर्तव्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीच्या खुनाच्या प्रकरणात महिलेची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
सोनाली गिरी असे आरोपी महिलेचे नाव असून पतीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका तिने उच्च न्यायालयात दाखल केली होती. बिअर बारमध्ये काम करणारी सोनाली 30 डिसेंबर 2009 रोजी कामाहून परतताना एका दुकानातून मद्य घेऊन घरी आली. त्यानंतर दुस-या दिवशी तिने आपल्या पतीच्या भावाला पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले, असे बचावपक्षाने सांगितले. मात्र, मृताचा भाऊ आला, तेव्हा त्याच्या भावाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. तसेच शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय पुराव्यातही ही आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले