आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ले रोखण्यासाठी अँसिड विक्री थांबवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एकतर्फी प्रेमातून तरुणींवर होणारे अँसिड हल्ले थांबवण्यासाठी शासनाने अँसिड विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत -प्रभावळकर यांनी सोमवारी केली. ‘स्टॉप अँसिड अटॅक’ या संस्थेने अँसिड हल्ल्यातील पाच तरुणींची कहाणी पत्रकारांना ऐकवली. या वेळी त्या बोलत होत्या.

अँसिड हल्ला करणारे आरोपी दहा वर्षांची शिक्षा भोगून सामान्य जीवन जगतात, परंतु हल्ला झालेल्या तरुणींचे आयुष्य मात्र कायमचे उद्ध्वस्त होते. रश्मी या तरुणीवर मैत्रिणीच्या भावानेच एकतर्फी प्रेमातून हल्ला केला होता. अर्चनावरही असाच हल्ला झाला होता. या तरुणाने हल्ला करण्यापूर्वी विष प्राशन केले होते. त्याचाही हल्ल्यानंतर मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. रूपा या मुलीवर ती झोपेत असताना तिच्या सावत्रआईने अँसिड फेकले. याच कारणामुळे शायना या तरुणीची तब्बल 17 वेळा प्लास्टिक सर्जरी करावी लागली. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणींवर राज्य शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत, अँसिड हल्ल्यातील तरुणींची गणना अपंग व्यक्तींमध्ये करावी तसेच त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.