आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींचा खर्च सरकारनेच करावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा. तसेच त्यांच्या पुनर्वसनामध्येही सरकारकडून मदत व्हावी, अशी मागणी कॉँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रमुख डॉ. अशोक गुप्ता यांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींना वाचवण्यासाठी 'सेव्ह द फेस' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेची माहिती सावंत यांनी दिली. अ‍ॅसिडची सहज उपलब्धता कमी केल्यास या हल्ल्यांना काही प्रमाणात आळा बसेल. तसेच अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींना अपंग प्रमाणपत्र देण्याची मागणी गुप्ता यांनी केली.