आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मिळाला आयुष्याचा जोडीदार; विवेक ओबेरॉयने गिफ्ट केला फ्लॅट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एका शुल्लक कारणावरून चुलत भावाकडून झालेल्या अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिता बेनबंसी (26) हिला मंगळवारी आयुष्याचा जोडीदार मिळाला. एका मिस्ड कॉलने ललिताचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. राहुल कुमार (27) हा तरुणासोबत ललिताने अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले. उल्लेखनिय म्हणजे ललिता आणि राहुलला बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेराय याने फ्लॅट गिफ्ट केला आहे.

17 ऑपरेशननंतर ललिता झाली बरी...
- 2012 मध्ये चुलत भावाने ललिताच्या चेहर्‍यावर अॅसिड फेकले होते. ललिताचा संपूर्ण चेहरा भाजला होता. तिच्यावर तब्बल 17 सर्जरी करण्यात आल्या. तेव्हा कुठे ती बरी झाली.
- ललिता आणि राहुलने ठाणे कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला. नंतर मुंबईत रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या अनेक तरुणी- महिला सहभागी झाल्या होत्या.
- ललिता मूळ उत्तर प्रदेशातील आझमगड येथील आहे.

एका मिस्ड कॉलने बदलले ललिताचे आयुष्य...
- घटनेनंतर ललिता आझमगडहून ठाण्यातील कळवा येथे राहात आहे. साहस फाउंडेशनने तिला मदतीचा हात दिला आहे. या मदतीवरच तिचा उदरनिर्वाह सुरु आहे.
- जवळपास दोन महिन्यांपूर्वी ललिताच्या मोबाइलवर एक मिस्ड कॉल आला होता. तो राहुलचा होता. ललिताने त्यावर कॉल केला आणि त्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात केव्हा झाले हे दोघांनाही कळले नाही. अॅसिड हल्ल्याने ललिताचा चेहरा विद्रुप झाला आहे. तरी देखील राहुलने अर्धांगिनी म्हणून ‍तिचा स्विकार करून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.  
 
विवेक ओबेरॉयने दिया घर
- ललिता आणि राहुलला अभिनेता विवेक ओबेरॉय याने फ्लॅट गिफ्ट केला आहे. सोबतच तो भविष्यात ललिताच्या चेहर्‍यावर करण्यात येणार्‍या ऑफरेशनचा खर्च करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...