मुंबई-
सलमान खानच्या हिट अॅंड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारले होते. या चुकातून धडा घेत मुंबईतील अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी एक सर्कुलर जारी केले आहे. यात
सलमान खानच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयातील 16 चुकांचा हवाला दिला आहे. हायकोर्टने म्हटले होते की, प्रॉसिक्यूशन पक्ष कोणताच आरोप सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे सलमान निर्दोष सोडले जात आहे.
पोलिस ठाण्यांना काय पाठवले आहे सर्कुलर...
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एसीपी केएमएम प्रसन्ना यांनी एक सर्कुलर जारी करीत हायकोर्टाने
सलमान खानच्या खटल्यात दाखवलेल्या त्रुटीवर मार्क (खूण) करून पोलिसांपर्यंत पोहचवले आहे.
- प्रसन्ना यांनी सर्व पोलिस अधिका-यांना इशारा दिला आहे की, वरील चुकांतून पोलिसांनी धडा घेतला आहे. याबरोबरच यापुढे कोणत्याही प्रकरणात त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
सर्कुलरमध्ये काय म्हटले आहे?
- कोर्टाने काही गडबडी, त्रुटी राहिल्या आहेत असे जे दाखवून दिले आहे त्या पोलिसांपर्यंत पोहचल्या आहेत. यावर कोणीच काही उत्तर देऊ शकले नाही.
- याचा अर्थ असा आहे की, कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या आहेत त्या सत्य आहेत व आमच्याकडे त्याबाबत काहीही उत्तर नाही.
- आम्ही संपूर्ण पोलिस दलाला सांगितले आहे की, भविष्यात कोणत्याही प्रकरणात अशी ढिलाई होऊ नये.
पोलिसांचे काय म्हणणे आहे?
-
सलमान खानबाबत समोर आलेल्या त्रुटीने आम्हाला सर्वांना धक्का बसला.
- देशात महाराष्ट्राचा अशा राज्यात समावेश होतो जेथे सर्वात कमी कन्विक्शन रेट आहे.
- पोलिसांचे म्हणणे आहे की, सलमान खानचा खटला वेगळा नाही. हिट अॅंड रन प्रकरणात अनेक त्रुटी राहिल्या आहेत.
- सलमान खानचे हे प्रकरण म्हणजे ढिसाळ चौकशीचा एत नमुना म्हणून पुढे आला आहे. अधिका-यांना सांगितले गेले आहे की, कोणत्याही केसच्या ट्रायलपूर्वीच सर्व तथ्ये ( फॅक्ट्स) व सत्यता पडताळून पाहिले पाहिजे.
सुप्रीम कोर्टात अपील करणार महाराष्ट्र सरकार
- नुकतेच महाराष्ट्र सरकारने हायकोर्टात सांगितले की, सलमान खानच्या निर्दोष सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले जाईल.
- यासंबंधी बांद्रा पोलिस अपील दाखल करण्यासाठी एक नव्याने ड्राफ्ट तयार करीत आहे.