आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Act Will Be Amended To Make Marathi Official State Language: Vinod Tawde

‘राजभाषे’साठी अधिसूचनेत बदल करणार : तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राची भाषा मराठी असली तरी अधिसूचनेप्रमाणे या भाषेचा वापर करण्याचा उल्लेख मोघमपणाने केलेला आहे. त्यामुळे राज्याची भाषा मराठी असली तरी तिला राजभाषेचा दर्जा नाही. त्यामुळे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मध्ये ‘मराठी राजभाषा’ असा सुस्पष्ट बदल येत्या पावसाळी अधिवेशनात केला जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

‘महाराष्ट्राच्या विद्यमान राजभाषा अधिनियमामध्ये (१९६४ ) कलम १ मध्ये संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ यामध्ये मराठी ही राज्याची राजभाषा असेल असा सुस्पष्ट उल्लेख नाही. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये त्यांची अनुक्रमे कन्नड, तेलगु आणि तामिळ ही भाषा अधिकृत राज्यभाषा असल्याचे त्यांच्या राज्यभाषा अधिनियमामध्ये सुस्पष्ट केलेले आहे. परंतु महाराष्ट्राच्या भाषेबाबतच्या उल्लेखात, जिचा अंगिकार केला आहे अशी देवनागरी लिपीतील मराठी भाषा असा समजावा असा अर्थ विद्यमान कायदा महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ च्या कलम २(क) अंतर्गत करण्यात आला आहे.’