आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Againest 162 Chitfund Company Mp Sommayya Demands To Maha Cm

राज्यातील चिट फंड कंपन्यांची होणार चौकशी, सोमय्यांच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रामध्ये चिटफंड घोटाळ्याच्या माध्यमातून ४० हजार कोटींची लूट झाल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला अाहे. त्याची दखल घेत या आरोपांची चौैकशी अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.राज्यातील १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून केली.

सेबीने राज्यातील १६२ चीटफंड कंपन्या बोगस असल्याचे जाहीर केले आहे. या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी सोमय्यांनी केलीे. यापैकी समृद्ध जीवन आणि साई प्रसाद कंपन्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी ते अधिक आग्रही अाहेत. पोलिस यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

चिट फंडातून कोणी लुटलं?
हरी ओम, पर्ल अग्रो, ट्विंकल प्लांट्स अँड प्रोजेक्ट, ओम गोएंका या कंपन्यांची सेबीतर्फे चौकशी सुरू आहे. जीकेबी इन्फ्रास्ट्रक्चर गरवारे क्लब हाऊस, सायट्रस हॉटेल्स, ऑरेंज हॉलिडेज,, आय-बेस सर्विस, युनिपे इंटरनॅशनल एनमार्ट रिटेल्स गुरुप्रसाद, व्हर्जिन गोल्ड इंटरनॅशनल, मीरा रिअलटर्स यांचाही १६२ कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.

पैसे परत करण्याचे आदेश
सेबीने १४ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार साई प्रसाद फूड्स लिमिटेड आणि साई प्रसाद प्राॅपर्टीज लिमिटेड यांना सध्याच्या सर्व गुंतवणूक योजना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनांमधून गोळा केलेला पैसा एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.