आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरोधात हक्कभंग आणणार :आमदार विनायक मेटे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करायचा निर्णय डिसेंबर 2012 मध्ये होऊनही याबाबत अद्याप अध्यादेश न काढणा-या राज्य सरकारविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतचा अध्यादेशही न काढला गेल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाला 25 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा संघटनांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने तीन महिन्यांत अहवाल तयार करून निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले होते.

स्मारकाबाबतही अध्यादेश नाही
मुंबईत उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाबाबतही तीन महिन्यांत अहवाल तयार करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिले होेते. मात्र, या सरकारने दोन्ही कामाचा अध्यादेश अद्याप काढला नाही. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अध्यादेश नसताना महाराजांच्या प्रेमापोटी कार्यवाही सुरू केली आहे मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घोंगडे भिजत पडले आहे, त्यामुळे अध्यादेश न काढल्याबाबत सरकारविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा आमदार मेटे यांनी दिला आहे.