आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थी शेतकऱ्यांची खोटी यादी देणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करू : फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची खोटी यादी देणाऱ्या व्यावसायिक बँकांवर कारवाईची केंद्राला शिफारस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास शासनाचे प्राधान्य असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दीपावलीनिमित्त ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहमेळाव्यात ते बाेलत हाेते.    

सर्वात माेठी कर्जमाफी असा गाजावाजा करत राज्य सरकार तब्बल ७७ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला हाेता. मात्र जसजसे कर्जमाफीचे निकष लागू हाेत गेले, तसतसा लाभार्थी शेतकऱ्यांचा हा अाकडा तब्बल दहा ते बारा लाखांनी कमी झाल्याची वस्तुस्थिती समाेर अाली. विशेष म्हणजे अजूनही लाभार्थींच्या अर्जांची छाननी सुरू असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या अाकड्यात अाणखी घट हाेण्याची शक्यता अाहे. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अातापर्यंत जाहीर झालेल्या कर्जमाफी याेजनांचे पैसे मधल्यामधे या बँका हडप करत हाेत्या ही बाब या घटनेमुळे समाेर अाली अाहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयाची संपूर्णपणे अंमलबजावणी झाल्यानंतर ज्या बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खोट्या याद्या दिल्या हाेत्या, त्या व्यावसायिक बँकांवर कारवाईची शिफारस अापण केंद्र सरकारला करणार अाहाेत.’  

नांदेड महापालिकेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेसला या निवडणुकीत एकहाती यश मिळाले असले तरीही भाजपच्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढली अाहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ३ टक्के मते हाेती, तर यंदाच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी २५ टक्क्यांवर गेली. नांदेडमध्ये भाजप पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर अाला. शिवसेना, राष्ट्रवादी अाणि एमअायएमची कामगिरी गेल्या वेळच्या तुलनेत खूपच घसरल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.  तसेच राज्यातील सरपंचपदांच्या निवडणुकीत भाजपच्या दाव्यांवरील टीकेकडे लक्ष वेधले असता, येत्या महिनाभरात अाम्ही भाजपच्या सरपंचांचा एक मेळावाच अायाेजित करणार अाहाेत, त्या वेळी तुम्हाला भाजपच्या विजयाची खरी व्याप्ती कळेल, असा दावा त्यांनी केला.    

मीडियावरील बाेगस अकाउंटची चाैकशी  
‘सरकारच्या विराेधात साेशल मीडियावर टीका करणाऱ्यांना नाेटिसा दिल्या नसून काही बाेगस अकाउंटवरील अाक्षेपार्ह पाेस्टला लाइक करणाऱ्या फक्त दहा जणांना नाेटिसा बजावल्या अाहेत. या दहा जणांकडून फक्त संबंधित बाेगस अकाउं्टसची माहिती घेण्यात अाली. हा सर्व तपशील अापण लवकरच शरद पवारांना पाठवणार अाहाेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. साेशल मीडियावर सरकारविराेधात टीका करणाऱ्यांना नाेटिसा धाडल्या जात असल्याबाबत पवारांनी सरकारवर टीका केली हाेती.

मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार : मुख्यमंत्री 
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही थेट भाष्य करत मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत विस्तार हाेणार असल्याचे सांगितले. तसेच राणेंच्या मंत्रिपदाबाबत विचारले असता, ते ‘एनडीएचे घटक पक्ष असून त्यांचा याेग्य ताे सन्मान राखला जाईल,’ असे माेघम उत्तर त्यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...