आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या मुखपत्रावर 3 दिवस बंदी घालावी; भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामना दैनिकाच्या छपाईवर तीन दिवस बंदीची मागणी भाजपने केली आहे. - Divya Marathi
सामना दैनिकाच्या छपाईवर तीन दिवस बंदीची मागणी भाजपने केली आहे.
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “दैनिक सामना’वर १६, २०  व २१ फेब्रुवारी हे तीन  दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांंनी  निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले आहे.   
 
‘सामना’मधील वृत्तांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. १६, २० व २१ फेब्रुवारी हे  तीन दिवस राज्यातील जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. ‘सामना’मधून शिवसेना मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी या मुखपत्रावर तीन दिवस बंदी आवश्यक असल्याची मागणी भाजपने केली आहे.    

ही तर आणीबाणी : उद्धव ठाकरे   
‘सामना’वर बंदी घालण्याची  मागणी म्हणजे आणीबाणीचा  प्रकार आहे. आता भाजप कुठल्या ताेंडाने इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणार आहे. मात्र, शिवसेना अशा दडपशाहीला घाबरत नाही. आमची तर अशी मागणी आहे की नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांची तोंडे बंद करा, असे प्रत्त्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख व ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरेंनी दिले.  

भाजप घाबरला : संजय राऊत    
आजपर्यंत ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी पाकिस्तानमधून होत होती. भाजपवालेही त्यांच्या सुरात सूर कधीपासून मिसळू लागलेत? ‘सामना’ हा देशाच्या शत्रूंचा शत्रू आहे. या दैनिकावर बंदी आणा अशी मागणी काॅंग्रेससह मुस्लिम लिग, ‘एमआयएम’सारख्या धर्मांध शक्ती करत होत्या. मात्र, आता घाबरलेल्या  भाजपकडून ही मागणी होत आहे. त्यामुळे त्यांची ‘डीएनए’ चाचणी करावी लागेल अाणि आता त्यांच्यासाठी आम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावा लागेल, असा टोला शिवसेना खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लगावला.
 
पुढील स्लाइडवर पाहा, भाजपने आयोगाला दिलेले पत्र... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...