आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activist #Trupti Desai Enter In Haji Ali Durgha On 28th April

तृप्ती देसाईंचा आता मुंबईतील हाजी अली दर्ग्याकडे मोर्चा, 28 ला दर्ग्यात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 28 एप्रिल रोजी हाजी हली दर्ग्यात तमाम महिलांसमवेत प्रवेश करू अशी माहिती तृप्ती देसाई यांनी आज दिली. - Divya Marathi
येत्या 28 एप्रिल रोजी हाजी हली दर्ग्यात तमाम महिलांसमवेत प्रवेश करू अशी माहिती तृप्ती देसाई यांनी आज दिली.
मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरातील, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरातील मंदिरात महिलांना प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमिता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना आपला मोर्चा मुंबईतील हाजी अली दर्ग्याकडे वळविला आहे. येत्या 28 एप्रिल रोजी हाजी हली दर्ग्यात तमाम महिलांसमवेत प्रवेश करू अशी माहिती तृप्ती देसाई यांनी बुधवारी दिली.
यासाठी 'हाजी अली, सबके के लिए' नावाचा फोरम स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही जात, धर्माविरोधात नाही. आम्ही फक्त समानता व महिलांना समान न्याय मिळावा यासाठी झगडत आहोत. दर्ग्यात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही हाजी अली दर्गा ट्रस्टसोबत चर्चा करण्यास तयार आहे असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले. दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर मु्स्लिम पुरुषांनी विरोध केला आहे. तसेच त्याठिकाणी गोंधळ घातला.
मुस्लिम महिलांचाही संपर्क
आमची लढाई समानतेच्या हक्काची असून मुंबईत हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी भारतीय मुस्लिम महिलांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असे तृप्ती देसाईंनी सांगितले होते. आता आमच्यावर राजकीय हेतूने प्रेरित आरोप केले जात आहेत. परंतु या आरोपात तथ्य नाही. आम्हाला आमचे कार्य पक्षातीत करायचे आहे. पक्षांचा पाठिंबा घेऊन असे कार्य शक्य नाही. आता 21 वे शतक चालू आहे. आम्हाला बदलण्याची आवश्यकता आहे. महिला लढ्यासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. आम्हाला मूठभर लोक थांबवू शकणार नाहीत, असे तृप्ती देसाईंनी सांगितले.
मुस्लिम महिला दर्ग्यातील प्रवेशासाठी आक्रमक
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना मजारपर्यंत प्रवेश द्यावा, या मागणीसाठी मुस्लिम महिलां काही अनेक काळापासून आंदोलन करीत आहेत. हे एकविसावे शतक आहे, आपण विज्ञान युगात आहोत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत महिला योगदान देत असून पुरुषांना समतेचे अधिकार मिळतात तर महिलांना का नाही? आम्हाला हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळायलाच पाहिजे, असे मुस्लिम महिलांचे म्हणणे आहे. जोपर्यंत हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू आणि दर्ग्यात घुसून दाखवूच असा निर्धारही या महिलांनी व्यक्त केला आहे.
ट्रस्टची आडमुठी भूमिका-
वर्षानुवर्षे महिलांसाठी खुली असलेली दर्ग्यातील कबर गेल्या दोन वर्षांपासून ट्रस्टने बंद केली. ही कबर महिलांसाठी खुली करा, कबरीवर चादर चढविण्यास महिलांनाही परवानगी द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेच्या डॉ. नुरजहान सफिया निझा आणि झाकीया सोमन महिलांच्या वतीने अ‍ॅड. राजू मोरे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर ट्रस्टने आडमुठी भूमिका घेत हाजी अली दर्ग्यातील कबरीजवळ मुस्लिम महिलांना घातलेली बंदी योग्यच असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. महिलांनी दर्ग्याच्या अंतर्गत असलेल्या मजारपर्यंत जाणे म्हणजे इस्लामनुसार पाप आहे. आमचा ट्रस्ट हा अल्पसंख्याक आहे. त्याला स्वत:ची कार्यपद्धती (व्यवस्थापन) अधिकार आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसारच तो चालविला जात असल्याने आमचे प्रश्‍न आम्ही सोडवू. त्यात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही आमचे निर्णय घेण्यास समर्थ आहोत असे हाजी अली ट्रस्टचे म्हणणे आहे.
पुढे वाचा व वाचा, गाभाऱ्यात प्रवेशावरून त्र्यंबकमध्ये पुन्हा वाद...