आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actor Amrapurkar Urging The Save Water,But Mob Beat Up Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याची नासाडी टाळण्‍यासाठी आवाहन केल्याने अभिनेते अमरापूरकरांना मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळामुळे पाण्याची नासाडी टाळून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना रेन डान्समध्ये रममाण झालेल्या बेभान जमावाने मारहाण केली. वर्सोवातील पंचवटी सोसायटी भागात ही घटना घडली.

अमरापूरकर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, धुळवडीनिमित्त या सोसायटीत सकाळी 10 पासूनच पाण्याचे शॉवर लावून नाचगाणी सुरू होती. यथेच्छ मद्यपान करून लोक संध्याकाळी 5 पर्यंत पाण्याची नासाडी करत होते. काही लोकांनी अमली पदार्थांचे सेवनही केलेले होते. दुष्काळामुळे पाण्याची नासाडी करू नका, असे सांगितल्याने सोसायटीतील नागरिकांना माझा राग आला व त्यांनी मला धक्काबुक्की केली. अमरापूरकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

कॅमेरे हिसकावले
या प्रकाराची माहिती कळताच काही वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन तेथे पोहोचले. परंतु, मद्यधुंद लोकांनी त्यांनाही धक्काबुक्की करत कॅमेरे हिसकावून घेतले व त्यातील चित्रीकरण पुसून टाकले, असे अमरापूरकर यांनी सांगितले.