आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Dilip Prabhavalkar Receives Dinanath Special Award

अभिनयाचा शाेध घेता घेता माणूसपण कळलं, प्रभावळकरांना दीनानाथ विशेष पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लगे रहाे मुन्नाभाई'मधील गांधीजींची भूमिका असाे वा "चाैकट राजा'मधील मतिमंद नंदूची भूमिका असाे, या पात्रांना समजून घेऊन अभिनयाचा शाेध घेता घेता माणूसपण कळत गेले, असे मनाेगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केले. मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात दीनानाथ मंगेशकर स्मृतीदिनानिमित्त अायाेजित पुरस्कार साेहळ्यात "दीनानाथ विशेष पुरस्कार' स्वीकारताना ते बाेलत हाेते.

नाट्यक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांना संगीत क्षेत्रातील सेवेसाठी, अभिनेता अनिल कपुरला चित्रपट क्षेत्रातील व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना पत्रकारितेतील योगदानासाठी गौरवण्यात आले. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना "वाग विलासिनी' पुरस्काराने, दापाेली येथे अानंदमयी ही सामाजिक संस्था चालवणाऱ्या अाशा कामत यांना सामाजिक कार्यासाठी तर अादित्य प्रतिष्ठानच्या अपर्णा अभ्यंकर यांना "अादिशक्ती' पुरस्काराने गाैरवण्यात अाले.

‘झक्कास’ नि गांधीगिरी
अनिल कपूर पुरस्कारादाखल मनाेगत व्यक्त करण्यासाठी उठताच प्रेक्षकांमधून त्याचा गाजलेला ‘झक्कास’ हा संवाद ऐकवण्याची प्रेक्षकांतून मागणी होऊ लागली. अनिल कपूरने त्यांना दाद देत आपल्या शैलीत तो संवाद सादरही केला. या वेळी त्याची मुलगी व अभिनेत्री साेनम कपूरदेखील उपस्थित हाेती. दिलीप प्रभावळकर यांनीही ‘लगे रहाे मुन्नाभाई’ चित्रपटातील गांधीजींचा एक खास संवाद सादर केला. खरे तर साेनू निगम यांच्या संगीत रजनीसाठी ताटकळलेल्या प्रेक्षकांनी ओरडायला सुरुवात केली होती. मात्र, प्रभावळकरांनी अत्यंत शांततेत अायाेजकांचा मान राखत ‘गांधीगिरी’ अवलंबवत अापला संवाद पूर्ण केला.