मुंबई - एतिहासिक नाटकांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेनेते प्रवेश केला आहे. आज (बुधवार) सकाळी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. यावेळी ते म्हणाले, शिवसेना वाट लावणारा पक्ष नसून वाट दाखविणारा पक्ष आहे. माझ्या मनात कायम शिवसेना होती आणि आहे. आजपासून मी अभिमानाने सांगू शकले मी शिवसैनिक आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महाराजांच्या भूमिकेने मला ओळख मिळाली त्यांच्या विचारांचा कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना म्हणून या पक्षाची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याआधी उद्धव ठाकरेंनी सध्या बेडूक उड्या सुरु आहेत असे म्हटले, तोच धागा पकडत डॉ. कोल्हे म्हणाले, 'या बेडूक उड्यांच्या स्पर्धेत वाघाच्या चालीने कोणत्या पक्षात जाता येत असेल तर तो शिवसेना आहे.'
डॉ. कोल्हे कोणत्याही अपेक्षेने शिवसेनेत आलेले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या एका पक्षातून दुस-या पक्षात बेडूक उड्या सुरु आहेत. कोणत्यातरी अपेक्षेने लोक एका पक्षातून दुस-या पक्षात जात आहेत. मात्र, डॉ. कोल्हे यांनी काहीही मागितलेले नाही. त्यामुळे त्यांचे दिलखुलासपणे स्वागत आहे. लवकरच त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी देण्यात येईल.'
पुढील स्लाइडमध्ये,
गडकरींच्या पाठीत खंजीर खूपसणार नाही - उद्धव ठाकरे