आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Manisha Recovering From Cancer, She Tweets For Her Fans

कॅन्सरमधून सावरतेय मनीषा कोईराला; फॅन्सना केले खास ट्विट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री मनीषा कोईरालाचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला असून ती हळूहळू यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत तिनेच न्यूयॉर्क येथून ट्विटरवरून ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी एका मॉलमधून भरपूर खरेदी केली. अमिताभ बच्चन यांची विशेष भूमिका असलेला 'द ग्रेट गट्सबाय' हा चित्रपट पाहिल्याचे तिने ट्विट केले आहे.


गेल्या वर्षी मनीषाला ओव्हरीन कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी अमेरिकेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ती न्यूयॉर्क येथेच असून लवकरच भारतात परतणार आहे. मनीषाने रामगोपाल वर्मा यांचा 'भूत रिटर्न्‍स' हा शेवटचा चित्रपट केला होता.