आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Mohan Joshi Doing Contraversial Statement On Belgoan Issue

जोशींची बेळगावप्रश्नी मुक्ताफळे, म्हणाले- सीमाप्रश्‍न ‘तुमचा’, तो तुम्हीच सोडवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव- सीमाप्रश्‍न हा ‘तुमचा’ प्रश्‍न आहे, तो तुम्हीच सोडवायचा आहे, असे वादग्रस्त विधान करीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी यांनी आज बेळगावमधील मराठी सीमावासीयांच्या जखमेवर मीठच चोळले. नाट्यसंमेलनात सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडणार नाही आणि सीमाप्रश्‍नांवर चर्चा करीत बसणे हे माझे काम नाही अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. दरम्यान, जोशी यांच्या या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखा सदस्यांनी जोशींच्या वक्तव्याचा निषेध करीत राजीनामे दिले आहेत.
यंदाचे मराठी नाट्यसंमेलन फेब्रुवारीत बेळगावात होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी मोहन जोशी यांच्यासह दीपक करंजीकर, वीणा लोकूर हे पदाधिकारी मंगळवारपासून बेळगावात आले होते. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने बुधवारी जोशींचा वार्तालाप ठेवला होता. त्यावेळी पत्रकारांनी नेहमीप्रमाणे सीमाप्रश्‍नावरून प्रश्नांची सरबत्ती केली. जोशी मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत काहीतरी बोलतील अशी अपेक्षा असतानाच जोशींचा तोल गेला व त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली.
जोशी म्हणाले, सीमाप्रश्‍न हा राजकीय प्रश्‍न आहे आणि नाट्यसंमेलनाचे व्यासपीठ हे कलावंतांचे आहे. त्यामुळे नाट्यसंमेलनात सीमाप्रश्‍नाबाबत ठरावबिराव काही मांडणार नाही आणि ते माझे काम नाही. तरीही कलावंत हा समाजाचा एक जागृत वर्ग असतो तसेच तो संवेदनशील असतो त्यामुळे त्यांनी याबाबत काही ठोस भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे पत्रकारांनी विचारल्यावर, राजकीय नेते त्यांच्या सभांत, कार्यक्रमात नाट्यक्षेत्रावर चर्चा करतात का? किंवा काही भूमिका घेतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारणी तसे करीत नसतील तर मग नाट्य संमेलन होत असताना कलावंतांनी अशी राजकीय भूमिका का घ्यायची. हा राजकीय विषय असून, कलांवताने यात पडू नये असे अकलेचे तारे जोशींनी तोडले.
पुढे वाचा, कर्नाटक सरकारने संमेलनाला निधी देण्याचे ठरवल्यानेच जोशींचे वक्तव्य...
मराठी बांधवांत जोशींविषयी तीव्र संताप...