मुंबई - 'टाइमपास' चित्रपटातील दगडूच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रथमेश परब व छोट्या पडद्यावरील अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना म्हाडाच्या लॉटरीत मुंबईत घर मिळाले आहे. प्रथमेश याला सायन येथील प्रतीक्षानगर तर विशाखा सुभेदार यांना मुलुंड येथे सदनिका मिळाली आहे. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात १०६३ घरांसाठी रविवारी सोडत जाहीर करण्यात आली. अर्जदारांसाठी संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
मुंबईतील तब्बल १ लाख २५ हजार इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यामुळे या लॉटरीची अनेकांना उत्सुकता होती. येत्या डिसेंबरमध्ये कोकण विभाग आणि मुंबई उपनगरांतील घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता त्यांनी सांगितले.