आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ravi Kishan Files Plaint For Missing Daughter

भोजपुरी अभिनेता रवी किशनची 19 वर्षांची मुलगी बेपत्ता, मुंबईत शोधाशोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड आणि भोजपुरी अभिनेता रवी किशन यांची 19 वर्षाची मोठी मुलगी गायब झाली आहे. याबाबत रवी किशन यांनी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रवी किशन गोरेगाव येथील लक्ष्मीनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. रवी यांची मुलगी दुस-यांदा घरात काहीही न सांगता गायब झाल्याचे डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली. मुंबई पोलिस पुढील तपास करीत आहेत.
रवी किशन यांना तीन मुली व मुलगा आहे. रेवा, तनिष्क, ईशिता आणि मुलगा सक्षम अशी त्यांची नावे आहेत.