आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ritesh Deshmukh Meet Raj Thackeray At Latur, Donate 25 Lakh For Jalyukta Shivar Yojana

रितेश देशमुखने घेतली राज ठाकरेंची भेट! \'जलयुक्त\'ला दिले 25 लाख रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश देशमुख, धीरज देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. - Divya Marathi
रितेश देशमुख, धीरज देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
लातूर- राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दुष्काळी दौ-यावर आहेत. राज आज लातूर जिल्ह्यातील भागाचा दौरा करीत आहेत. लातूर येथे दुष्काळी कामांची पाहणी करून राज लातूरात आल्याची माहिती मिळताच राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली. लातूरमधील पाणीटंचाईसाठी स्थानिक मनसे तसेच मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.
जलयुक्त शिवार योजनेला रितेशने दिले 25 लाख रूपये-
अभिनेता रितेश देशमुख याने लातूरच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी 25 लाख रूपये दिले आहेत. रितेशच्या या मदतीमुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिनेजगतातील अनेक मंडळी सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून येत आहेत. मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी ‘नाम’ फाउंडेशनद्वारे काम करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार यानेही दुष्काळग्रस्तांसाठी आतापर्यंत 50 लाख रूपये दिले आहेत. आमीर खान यानेही ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून काम करत आहे. आता या मदत कार्यात रितेश देशमुख यानेही आपले नाव कोरले आहे.
पुढे पाहा, रितेश देशमुखने दिला 25 लाखांचे चेक....