आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सचिनला मिळाले ३४ लाख परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीएमडब्ल्यू कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेने काेर्ट-कचेरीच्या धास्तीने अखेर ही रक्कम मराठी अभिनेता सचिन पिळगावकरला परत केली अाहे.

एका क्रीडा महोत्सवासाठी पाचगणीत गेलेल्या सचिनची अनघा बाेरीकर नामक महिलेशी अाेळख झालीह ाेती. तिने अापण स्वत: कारडिलर असल्याचे सांगून ५४ लाखांची बीएमडब्ल्यू कार फक्त ३४ लाखात मिळवून देण्याचे अामिष सचिनला दाखवले. त्यानुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये सचिनने तिच्याकडून ३४ लाखांत कार घेतली होती. मात्र, काही दिवसांतच खऱ्या डीलरने सचिनला फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

ती कार अनघाने एका शोरूममधून टेस्ट ड्राइव्हसाठी अाणून नंतर ती सचिनला दिली हाेती. त्यामुळे संबंधित शाेरुम मालकाने सचिनकडून ही कार परत नेली. अापली फसवणूक झाल्याचे लक्षात अाल्यानंतर सचिनने अनघाविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. नंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेऊन तडजोड करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर फसवणुकीची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे न्यायमूर्तींनी आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...