आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Salman Khan's Father Launches Narendra Modi's Urdu Website

नरेंद्र मोदी यांच्या उर्दू संकेतस्थळाचे लाँचिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उर्दू भाषेतील संकेतस्थळाचे लाँचिंग बुधवारी मुंबईत झाले. लेखक आणि अभिनेता सलमान खान यांचे पिता सलीम यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे लोकार्पण झाले.

मोदी यांनी गुजरातचा कसा विकास केला, कोणते प्रयोग केले याविषयी संकेतस्थळ बनवण्यात आले आहे. त्या संकेतस्थळाचा पत्ता narendramodi.in असा आहे.

मोदी यांचे संकेतस्थळ मराठी, हिंदी, ओडिया, पंजाबी, गुजराती, मल्याळी, कन्नड, तेलगू, संस्कृत, बंगाली अशा 11 प्रादेशिक भाषांसह रशियन, चिनी, स्पॅनिश आणि इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषांतही आहे.

मुस्लिम सुरक्षितच
मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लिम सुरक्षित आहेत, असे सांगून गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर मुस्लिम आयुष्यभर रडत राहणार का, असा सवाल सलीम यांनी या वेळी केला.