आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते सतीश शहा ‘हंड्रेड पर्सेंट पेस्तनजी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । ‘तुला सांगते भावसाहेब, गॉड इज सफरिंग आमच्या बायकोचा चिमटा असतो ना तसा, चिमटा म्हणून दुखते पर बायडीचा अशते म्हणून चांगले पन वाटते.’ हे पु. लं. देशपांडे यांनी अजरामर केलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तकातील एक तितकीच अजरामर वल्ली म्हणजे पेस्तनकाका यांचे देवाबद्दलचे मत.
पु.लं.च्या आयुष्यावर बेतलेल्या ‘गोळाबेरीज’ चित्रपटात अभिनेते सतीश शहा यांनी एकेकाळी रेल्वेत मोटरमन असलेल्या पेस्तनकाकांची भूमिका केली आहे. डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित आणि क्षितिज झारापकर दिग्दर्शित ‘गोळाबेरीज’ या चित्रपटात सदैव माणसांत वावरलेल्या पुलंना भेटलेल्या व्यक्ती विविध ताकदीचे कलाकार साकारत आहेत. पारशी पद्धतीचे मराठी बोलणारे रेल्वे मोटरमन म्हणून रिटायर झालेले पेस्तनकाका साकारण्यासाठी हिंदीतील अनुभवी अभिनेते सतीश शहा यांची निवड ‘हंड्रेड पर्सेंट’ योग्य असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. पारशी माणसाची भूमिका करण्यासाठी सतीश शहा यांनी खास प्रयत्न केल्याचे सांगितले.